१.
बँकेमार्फत हुतात्मा बाबु गेनू सैद स्मारक, मु. पो. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगांव व हुतात्मा राजगुरू स्मारक, ता. खेड यांना स्मारकाच्या देखभालीसाठी प्रत्येकी रु. ५.०० लाख अर्थसहाय्य केले आहे.  
२.
बँकेचा कर्जपुरवठा हा प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठी होत असल्याने त्यांच्या मुलांना शाखा / महाविद्यालयामध्ये लायब्ररी, शिक्षण साहित्य, संगणक सुविधा, क्रिडा साहित्य, गणवेश, स्वच्छतागृह इ. सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत देण्यात येत आहेत.  
३.
पुणे जिल्हा परिषद, पुणे यांचेकडून तालुका पातळीवरील कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी जाहिर झालेले कृषीनिष्ठ शेतकरी व त्यांचे पत्नीस प्रत्येकी रु. ५,०००/- देऊन सन्मानित करण्यात येत आहे.  
४.
स्वयंसहाय्यता बचतगटांना बचतीच्या प्रमाणात थेट विनातारणी मुदत कर्ज व मध्यम मुदत कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. नियमित कर्जफेड करणार्‍या बचतगटांना ०% व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.  एस. जी. एस. वाय. योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींच्या बचतगटांना व्यवसाय उभारणीसाठी प्रकल्पाअंतर्ग कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.
बचतगटांना मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी "महिला विकास कक्ष"  कार्यान्वीत असुन, बचत गटांना मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण व हिशोब लेखनासाठी स्टेशनरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी बँकेच्यावतीने लक्ष्मीरोड शाखा इमारतीमध्ये कायमस्वरूपी "शारदा बाजार" विक्री केंद्राची सुविधा करण्यात आली आहे.