कर्ज योजना - बिगर शेती कर्ज
शैक्षणिक कर्ज
कर्जाचे उद्देश हुशार व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देशांतर्गत / परदेशातील विविध शाखांच्या उच्च शिक्षणासाठी येणार्‍या खर्चासाठी कर्ज पुरवठा केला जाईल. पात्र कोर्सेस बँकेच्या शैक्षणिक कर्ज धोरणानुसार राहील.
कर्ज मागणीसाठी पात्रता अर्जदार व जामिनदार बँकेचा सभासद / नाममात्र सभासद पाहिजे. बँकेचा कार्यक्षेत्रात राहणार भारतीय नागरिक पाहिजे. बँकेचा खातेदार असला पाहिजे. अन्य पात्रता बँकेच्या शैक्षणिक कर्ज धोरणानुसार राहील
कर्जाची परतफेड विद्यार्थी / पालक यांची परतफेडीची क्षमता विचारात घेऊन शैक्षणिक कर्जाची कमाल मर्यादा राहील.
  • देशांतर्गत शिक्षणासाठी कमाल रु. १०.०० लाख
  • परदेशातील उच्च शिक्षणासाठी कमाल रु. २०.०० लाख
व्याजदर बँक वळोवेळी ठरविल तो व्याजदर राहील. बदलेले व्याजदर कर्जदारावर बंधनकारक राहील. व्याजदरानुसार दरमहा दैनिक पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येईल व होणारे व्याज महिना अखेरीस कर्ज खाती नावे टाकले जाईल. थकित रक्कमेवर 1% दंडव्याज आकारले जाईल
कर्ज प्रकरण सोबत सादर करावयाची कागदपत्रे बँकेच्या शैक्षणिक कर्ज धोरणानुसार कागदपत्रे सादर करावी लागतील.
तारण कर्ज घेऊ इच्छिणारे अर्जदार कायम पगारदार किंवा शेती व्यवसायीक असल्यास बँकेच्या धोरणानुसार तारण घेतले जाईल.
कर्जाची परतफेड
  • शिक्षणाचा / कोर्सचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर १ वर्षाने किंवा विद्यार्थ्यास नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यात यापैकी जी तारिख अगोदर असेल त्या तारखेपासून पुढे ५ वर्ष परतफेडीचा कालावधी राहिल.
  • कर्ज उचलीपासून पुढे १ वर्ष कर्जावरील व्याजाची आकारणी सरळव्याज पध्दतीने केली जाईल व होणारे व्याज येणे दाखविले जाईल. वर्षानंतर संचित व्याज कर्ज खाती नावे लिहिले जाईल व पुढे दरमहा होणारे व्याज वसुल केले जाईल. नोकरदार कर्जदारांसाठी हप्ता सुरु झाल्यानंतर संचित व्याज + मुद्दल याची मासिक हप्त्याने ई. एम. आय. ने व शेती व्यवसायिकांसाठी संचित व्याज + मुद्दल सहामाही हप्त्याने परतफेड केली जाईल. हप्ता सुरु झाल्यानंतर मासिक व्याजाची रक्कम कर्ज खाती नावे लिहिली जाईल.
  • अर्जदार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अगर त्याने कोणत्याही कारणान्वये शिक्षण पूर्ण न केल्यास अशा कर्जदाराच्या बाबतीत बँक त्याच्याकडे असलेल्या कर्जाची रक्कम एक रकमी वसुल करुन घेण्यास बँकेस अधिकार राहिल.
इतर खर्च मुद्रांक खर्च, प्रोसेसिंग खर्च, पोस्टेज खर्च बँकेच्या धोरणानुसार राहिल.
मार्जिन देशांतर्गत तसेच परदेशातील शिक्षणासाठी रु. ५.०० लाखापर्यंतच्या कर्जपुरवठय़ास मार्जिन ( स्वगुंतवणूक ) राहणार नाही. रु. ५.०० लाखावरील कर्जपुरवठय़ास १५% मार्जिन राहिल.
- अन्य अटी बँकेच्या धोरणानुसार राहतील.
- अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा.
<< मागील पान